आळंदीतील चार मोबाईल टॉवर सील

रेंज गेल्याने ग्रहाकांना मनस्ताप : कर थकवल्याने नगरपरिषदेची कारवाई

आयडियाचे दोन, रिलायन्स, व्होडाफोन कंपन्यांच्या टॉवरचा समावेश
आळंदी दि.31(वार्ताहर) – आळंदी नगरपरिषदेची विशेष मालमत्ता कर वसुलीच्या धडक मोहिमेत रविवारी (दि. 31मार्च) अखेरच्या टप्प्यात आयडियाचे दोन, रियालन्स व व्होडाफोन कंपनीचे प्रत्येकी एक असे एकूण चार टॉवर सील केल्याने भ्रमणध्वनी सर्व यंत्रणा ठप्प झाली तर रेंज गेल्याने ग्राहकांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.

आळंदी नगरपरिषेद हद्दीतील मिळकतीची मिळकत कर, पाणीपट्टी व इतर भाडे वसुलीची धडक मोहीम राबवून नळजोडणी खंडीत करुन व जप्ती (सील) करण्याच्या माघ्यमातून मागील तीन वर्षांपासून 71 टक्के वसुली झाल्याचे आळंदी नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले थकबाकीचे संपूर्ण उद्दीष्ट गाठण्यासाठी वसुली पथकाने वसुली कार्यक्रम विस्तृत व कठोर केला असून थकबाकी वसुली मोहिम 15 एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे भूमकर यांनी सांगितले. आज सील केलेले चार टॉवर कंपनीकडून पाच लाखांची वसुली करण्यात आली असून, उर्वरित रक्कम भरल्यानंतरच सील काढण्यात येईल, असे भूमकर यांनी स्पष्ट केले.

या विशेष वसुली मोहिमेत मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली अधिकारी राम खरात, किशोर तरकासे अशोक राजगुरू, रामदास भांगे यांच्या कार्यक्षम मोहिमेत मनोज राठोड भागवत सोमवंशी, दत्तात्रय सोनटक्के, रमेश थोरात स्वप्निल भोसले,अर्चना पवार,मल्हार बोरगे,नाना धुंडरे विशाल बासरे,अक्षय शिरगिरे,साधना शिंदे,आरती गांधी आदींनी परिश्रम घेतले.

  • संपूर्ण आळंदी शहर व हवेली विभागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तरी सर्व मालमत्ताधारकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. दि. 5 एप्रिल पासून झोननिहाय पाणीपुरवठा केला जाणार आहे.
    दत्तात्रय सोनटक्‍के, विभाग प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, आळंदी नगरपरिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)