आळंदीतील खड्डे बुजविण्यास सुरूवात

आळंदी -येथील देहूफाटा (वाय जंक्‍शन) ते नवीन पुलाच्या कोपऱ्यापर्यंत संततधार पावसामुळे आळंदीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य अशा आशयाचे वृत्त प्रभातमध्ये बुधवारी (दि. 30) प्रसिद्ध झाले होते.
प्रचंड संख्येने पडलेल्या खड्ड्यांचे वास्तव लक्षात घेत आळंदी नगरपालिकेला लागलीच जाग येऊन प्रभातमधील वृत्त वाचकांच्या नजरेखालून जाते न्‌ जाते तोच याठिकाणी मुरूम टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रभातमधील वृत्ताची दखल घेत सकाळीच मुरूम टाकण्यास सुरूवात केल्याने नागरिकही आश्‍चर्य चकीत झाले. याच रस्त्यावरून काल कमालीचे आदळे खात गेलेले असंख्य वाहनचालक आज सकाळीच रस्त्याची अचानक झालेली दुरूस्ती पाहून आश्‍चर्यचकीत झाल्याशिवाय राहिले नाहीत.
आज दिवसभरात वाय जंक्‍शन ते आराधना हॉटेलपर्यंत काम पूर्ण झाले, उर्वरीत काम उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अशोक कांबळे (उमरगेकर) यांनी सांगितले. या आळंदी पालिकेच्या प्रथमच दाखविलेल्या कार्यतप्तरतेमुळे आळंदीकरांनाही आज आश्‍चर्याचा धक्का बसला. यावेळी सर्व स्तरांतून प्रभातचे अभिनंदन होत असल्याचे चित्र दिवसभरात शहरभर पाहवयास मिळत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)