आळंदीतील केटी बंधरा फुटण्याची शक्‍यता

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीला विविध समस्यांनी ग्रासले असून अनेक ठिकाणच्या टाक्‍या, तसेच इंद्रायणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. जर बंधारा आणि टाकी फुटली तर मोठी दुर्घटना घडू शकते तरी नगर पालिके याकडे त्वरीत लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी अन्यथा घडणाऱ्या घटनेला नगर पालिका जबाबदार राहिल, असे निवेदन “आळंदी विकास मंच’च्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकरी समीर भूमकर यांना दिले आहे.
आळंदी विकास मंचने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या नमूद केले आहे की, आळंदी-मरकळ रस्त्यावरील जुनी (कालबाह्य झालेली) पिण्याच्या पाण्याची टाकी धोकादायक अशा स्थितीत उभी आहे, आळंदी नगर पालिका शॉपिंग सेंटर खालील व्यापारी गाळे हे फारच जुने झाले असून त्यावरील नवीन मजल्याच्या बांधकामांचे ऑडिट करणे व त्यावर मोठ-मोठे होर्डिंग्य लावण्यात आलेले आहेत. त्याखाली नगर पालिकेची शाळा क्रमांक चार भरत असून पुण्याप्रमाणे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती आळंदी होण्याची शक्‍यता आहे. इंद्रायणी नदीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन पुलाची मुदत संपली असून तो सध्या धोकादायक स्थितीत आहे. तसेच इंद्रायणी नदीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची देखील मुदत संपली असून या बंधाऱ्यास ठिकठिकाणी सुरक्षारक्षक लोखंडी जाळी बसविण्यात आल्या होत्या मात्र, तिही सध्या गायब झाल्याने पाण्याची गळती सुरू आहे, त्यामुळे पुण्यासारखी घटना याही ठिकाणी घडू शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)