आळंदीतील ऐतिहासिक विहीर गायब?

आळंदी- राज्यावर सध्या दुष्काळाचे संकट आले असून त्याच पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारद्वारा उपाय योजना राबविल्या जात आहेत. परंतु आळंदी-मरकळ रस्त्यावर अहल्याबाई होळकर यांच्या काळात चऱ्होली खुर्द येथील गट क्र. 498 येथे खोदलेली ऐतिहासिक विहीर गेल्या 50 वर्षांपासून जुन्या पंचक्रोशीतील गावांना पिण्याचे पाणी दिले जात होते; परंतु गेल्या एक महिन्यापासून उपयुक्‍त अशीही विहीर या ठिकाणाहून हरवली असल्याने “कोणी विहीर देता का विहीर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकार मार्फत जलसंपदा विभाग तसेच भुगर्भातील पाणी स्रोत मोठ्या प्रमाणात वाढवा व पाणी सिंचन विभागाद्वारे देखिल पाणी आडवा, पाणी, जिरवा, पाणी वाचवा हे उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर ठेवून, नवीन विहीर खोदाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. त्यातच विहीर गायब होणे म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे या घटनेबाबत आळंदी शहर कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, तहसीलदार सुचित्रा आमले व मंडलाधिकारी आदींना निवेदन पाठविले असल्याचे राजीव गांधी पंचायत राजचे अध्यक्ष संदीप नाईकरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)