आळंदीतील अंध शाळेला 24 लाखांची मदत

आळंदी- येथील राष्ट्रीय दृष्टीहीन संघ संचालित जागृती अंध मुलींच्या शाळेच्या बांधकामासाठी पुण्यातील राठी भावंडांनी तब्बल 24 लाख 25 हजारांची देणगी देवून समाजात एक आदर्श निर्माण केला. सूर्यकांत राठी, श्रीनिवास राठी, दिलीप राठी, सुनील राठी असे या चार भावंडांची नावे आहेत. जागृती अंध शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 24 लाख 25 हजारपैकी 14 लाख 25 हजारांचा धनादेश दिला. महिनाभरत उर्वरीत 10 लाखाचा धनादेश देण्यात येणार असल्याचे श्रीनिवास राठी यांनी सांगितले. तर राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर,प्रवक्त्‌या सकीना बेदी,समन्वयक गजानन मगर यांनी हा धनादेश स्वीकारला. श्रीनिवास राठी म्हणाले कि, आम्ही गेली 10 वर्षांपासून जागृती अंध शाळेच्या संपर्कात असल्याने त्यांचे कार्य जवळून पाहिले.राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने अंध मुलींसाठी एक भव्यदिव्य शिक्षण – कौशल्ये सेंटर उभारण्यासाठी धडपड करीत आहे.या इमारतीचे अर्धे बांधकाम झाले.अर्धे बांधकाम पूर्ण करण्यासाठी या संघास खूपच पैशाची गरज आहे हे ओळखून आम्ही चौघांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला. भोसरीत असलेल्या लघु उद्योगसमुहातूनच हा निधी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)