आळंदीकरांवर पुन्हा विकतचे पाणी घेण्याची वेळ

आळंदी- इंद्रायणी नदीपात्रतील जलपर्णी रोखण्यासाठी “आयडियाच्या कल्पने’द्वारे आळंदी नगरपालिकेने सुमारे अडीच लाख रूपये खर्चून बांधलेले प्लॅस्टिकचे ड्रम समाजकंटकांनी तोडून टाकल्याने बंधारा जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण यंत्रणेवर ताण आल्याने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसल्याने पुन्हा विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांनी इंद्रायणीवरील बंधाऱ्याच्या मागे एक किलो मीटरवर जलपर्णीस अटकाव घालण्यासाठी सुमारे 125 प्लॅस्टिक ड्रम लावून ते वायर रोपचा वापर करून पक्‍क्‍या स्वरूपात जलपर्णी थांबवून बंधाऱ्यात जाणाऱ्या पाण्याला मोकळा श्‍वास मिळवून दिला होता. त्यामुळे पाणी स्वच्छ झाले होते, त्याची दुर्गंधी नाहिशी होवून पाण्यातील ऑक्‍सीजनचे प्रमाण वाढले होते, तर मासे मुक्‍तसंचार करू लागले होते. मात्र, पालिकेची ही “आयडियाची कामगिरी’ समाजकंटकांना देखवले नाही. त्यामुळे ड्रम विखुरले गेले, जलपर्णी पुढे सरकली, पाण्याचे प्रदूषण वाढले अन्‌ पुन्हा आळंदीकरांना काळ्या पाण्याच्या शिक्षेस सामोरे जावे लागले. त्यामुळे नळाला अतिशय काळवंडलेले वासयुक्‍त पाणी बंधाऱ्यात शिरल्याने येथील जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण येऊन ती कुचकामी ठरली आहे. आता अंधोळ करण्साठी देखिल हे पाणी उकळून आणि गाळून घ्यावे लागणार आहे. पिण्याचे पाणी तर गेली दहा वर्षांपासून नागरिक विकतचेच पीत आहेत तर आता नळाच्या पाण्यात आळ्या दिसू लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

  • पुढील दोन आठवडे कमी दाबाने पाणी पुरवठा
    पिंपरी महापालिकेने नदीपात्रात सांडपाणी सोडल्याने जलपर्णी वाढली आहे. ती रोखण्यासाठी पालिकेने वायररोप लावुन बॅलरचा देखिल वापर केला होता मात्र, काही समाजकंटकांनी वायररोप तोडुन टाकल्याने बॅरल विखुरले गेले आणि पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यात पुन्हा जलपर्णी साठुन राहिली. याचा परिणाम जलशुद्धीकरण यंत्रणेवर होत आहे. याशिवाय पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. नदी पात्रातील मैलायुक्‍त पाण्याचे प्रमाण वाढले आहे, यामुळे शुद्धीकरण करताना पंपीग यंत्रणेवर ताण येत आहे.त्यामुळे टीशल व क्‍लोरिन जादा प्रमाणात वापरू शकत नाही.कारण त्याचा नागरिकांच्या आरोग्य वर परीणाम होऊ शकतो.त्यामुळे शहरात पुढील दोन आठवडे अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तरी नागरिकांनी हे पाणी उकळून व गाळुन प्यावे असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)