आळंदीकरांवर “जिझीया’ कर

  • मिळकतधारक मेटाकुटीस : अव्वाच्या सव्वा वाढ

आळंदी – आळंदी नगरपरिषदेने चालु आर्थिक वर्षात सन2017-18 च्या वार्षिक कर आकारणीस आव्व्वाच्यासव्वा वाढ करून, आळंदीकरांवर एकप्रकारे “जिझीया’ कर लादल्याने सर्व सामान्य मिळकतधारक खऱ्या अर्थाने मेटाकुटीस आले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच विविध प्रकारच्या करांमध्ये अवास्तव वाढ करण्यात आल्याने अनेक करदाते हे अपीलात गेले आहेत. तर आळंदी नगरपरिषद वाढीव कर आकारणी कृती समितीचे एक शिष्टमंडळ मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याकरीता सकाळीच रवाना झाले आहेत. यंदाच्या विविध वाढीव करामध्ये संकलित कर, शिक्षण कर, सर्वसाधारण स्वच्छता कर, अग्निशामन कर, मलनि:सारण कर शिवाय पाणीपट्टीही 1200 रूपये वेगळेच तेही पिण्याचे पाणी न पुरवता.ज्या मिळकतदारांचे क्षेत्र कमी त्यांना जादा आकारणी व ज्यांचे क्षेत्र (मालमत्ता) जास्त त्यांना आवाक्‍यात कर आकारणी अशा पद्धतीने यंदा सर्वच मालमत्ताधारकांना कदापी मान्य न होणारी वाढीव कर आकारणीने सर्वजण मेटाकुटीस आले असून ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
पालिका आपल्या कर्तव्यानुसार सर्व सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या नागरी सोयी-सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. तर बाराही महिने येथे समस्यांचा डोंगर उभा केलेला असताना कर मात्र, आकाशाला भिडणारे आकारले जातात. यावर सर्वच आळंदीकर प्रशासनासह अधिकारी, पदाधिकारी, स्थानिक नगरसेवकांवर कमालीची नाराजी व्यक्‍त करीत आहेत.

  • महापालिकेपेचाही जादा आकारणी?
    आळंदी नगरपरिषद ही ब्रिटिश कालीन “क’ दर्जाची नगरपरिषद असताना देखिल येथे महापालिकेपेक्षाही जादा आकारणी करण्यात येत असल्याचे आरोप सर्व स्तरातून होत आहेत. दीड गुंठा जागेत उभारलेल्या साध्या मालमत्तेस 74 हजार रूपये घरपट्टी आल्याने मिळकतधारक कमालीचे हैराण झाले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)