आळंदीकरांनी रात्र काढली मच्छारांसोबत

आळंदी- आळंदीसह परिसरात सोमवारी (दि. 1) मध्यरात्री 1 पासून “बत्तीगुल’ झाल्याने नागरिकांना मच्छरांसोबत रात्र काढावी लागल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबात नाराजी व्यक्‍त केली.
आळंदी येथे मध्यरात्रीनंतर विज पुरवठा खंडीत झाल्याने येथील कार्यालयात तक्रार देण्यासाठी लॅंड लाईनवर फोन केला असता तो कोणीही घेतला नाही, त्यानंतर तक्रार देण्यासाठी थेट कार्यालय गाठले मात्र, त्याठिकाणी एकही कर्मचारी नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, आळंदी येथील अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून हजर नसल्याने सर्व जबाबदारी कर्मचारी वर्गाचा जीवावर महावितरण कंपनीचा कारभार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्‍त केला.

  • अचानक आलेल्या वादळी पावासामुळे मुख्य डीपी जळाली असून त्याचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करुन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल व कर्मचाऱ्यांबाबत असलेल्या तक्रारींचे देखील निवारण केले जाईल.
    – राहुल ढेरे, उपकार्यकारी अधिकारी, चाकण, महावितरण

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)