आळंदीकरांनाही पाणीटंचाईचे चटके

आळंदी- जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात कोसळल्याने 10 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यातून खेड तालुक्‍याला वगळल्याने शेतकरी निराश झाला आहे. त्यातच इंद्रायणी नदी आतापासूनच कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे पाणी बचतीचे सल्ले दिले जात असताना बांधकामासाठी सर्रासपणे पाण्याचा उपसा केला जात असल्याने याकडे कोण लक्ष देणार असा सवाल आळंदीकरांनी विचारला आहे. मावळात उगम पावलेली इंद्रायणी नदी दरवर्षी पावसाळ्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत खळखळून वाहत असते. तर यंदा अत्यल्प पावासाने ती सुमारे सहा महिने अगोदरच कोरडी ठाक पडल्याने आळंदीकरांसह भाविकांना देखील पिण्यासह वापराच्या पाण्याचा सामना करावा लागणार असल्याने आत्तापासूनच पाणी बचतीचे धोरण राबवले जाणार असल्याचे नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांनी सांगितले. तर पाणी पुरवठा समिती सभापती व उपाध्यक्ष सचिन गिलबिले म्हणाले की, यात्रा काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणी पुरवावे, तसेच वडिवळे धरणातून यात्रेपूर्वीच पाणी सोडण्याची मागणी प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)