आळंदीकरांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्‍तता

आळंदी-15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची उभारणी करण्यात आली. त्यास तीर्थक्षेत्र आळंदी व उद्योग नगरी चाकण पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात झाली आहे. आता ठिकठिकाणी वाहतूक शाखांची देखील उभारणी करण्यात आली असल्याचे पिंपरी चिंचवड आयुक्तांलयामार्फत सांगण्यात आले.
आज (शनिवारी) देहू-आळंदी रस्त्यावरील हिलमिस्ट या सुसज्ज व भव्य नूतन वास्तूत पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत दिघी- आळंदी वाहतूक विभाग शाखेचे उद्‌घाटन आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पद्मनाभन म्हणाले, नव्यानेच उभारणी झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तांलयायात पुरेसे अधिकारी, पोलीस कर्मचारी व इतर सामग्रीची कमतरता भासत आहे. तरी येत्या 2/3 महिन्यांत सर्वकाही पूर्वपदावर आणण्याचा शासकीय स्तरावर आमचा प्रयत्न राहील. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे बाराही महिने कोणत्या न कोणत्या कारणांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी होत असते, त्यामुळे यापुर्वी वाहतूक कोंडी ही आळंदीकरांसाठी नित्याची बाब होऊन बसली होती. तरी यापुढे आळंदीकरांची या कोंडीतून आम्ही लवकरच मुक्तता करू.
यावेळी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, माजी महापौर नीतिन काळजे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक भाऊ तापकीर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, बाळासाहेब पानसरे, सुरेश गायकवाड, व दिनेश वरुटे, राहुल चोरडिया, हभप निलेश लोंढे, युवा नेते दत्ता तापकीर, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही. के. कुबडे, विनायक ढाकणे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, मच्छिंद्र शेंड्ये आदींसह नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नूतन शाखेसाठी पोलीस प्रशासनास ज्यांनी ही सुसज्ज इमारतीची जागा उपलब्ध करून दिली त्यांचा यथोचित सन्मान आर. के. पद्मनाभन यांचे हस्ते करण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)