आळंदीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

तीर्थक्षेत्र आळंदी मंजूर विकास आराखडा योजनेंतर्गत बाह्यवळण मार्गाचे भूमिपूजन
आळंदी  -येथील तीर्थक्षेत्र आळंदी मंजूर विकास आराखडा योजनेतील आळंदी बाह्यवळण मार्गाचे रस्ते विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि खेडचे प्रांत सुनील गाढे यांचे हस्ते उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, सागर बोरुंदिया, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, सचिन पाचुंदे, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, मंडूबाबा पालवे, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, गंगाधर मुंगसे, संदेश तापकीर, मंडलाधिकारी ज्ञानेश्वर कारकर, मनोहर दिवाणे, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मंजूर बाह्यवळण मार्गाच्या 18 मीटर रस्त्याचे विकासकामाचे भूमिपूजन आळंदी-केळगाव रस्त्यालगत करण्यात आले. इंद्रायणी नदी घाट (ज्ञानेश्वर महाराज बाग) ते चाकण रस्ता जोडणाऱ्या रस्त्याचे विकास कामाची सुरुवात करण्यात आली. यामुळे आळंदीतील मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. यामुळे रस्ते विकासाच्या या निर्णयाचे आणि खेडचे प्रांत सुनील गाढे यांनी येथील रस्ते विकासाचे कामाना दिलेल्या गती मुळे येत्या कार्तिकी यात्रेपूर्वी आळंदी ला जोडणारे रस्ते विकसित होतील अशी अपेक्षा नागरिक भाविक व्यक्त करीत आहेत. खाजगी तडजोडीने रस्ते भूसंपादित करून विकास कामे हाती घेण्यास आळंदीत त्यांनी सुरुवात केल्याने नागरिकांना मध्ये देखील समाधान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)