आळंदीकरांकडे तीन कोटींची थकबाकी

नगरपरिषदेकडून थकबाकीदारांकडून वसुलीला प्रारंभ : 20 नळ जोड तोडले
आज घरासमोर बॅंड वाजणार/एका दिवसांत साडेसात लाखांची वसुली

आळंदी- आळंदी नगरपरिषेद हद्दीतील मिळकतधारकांच्या मिळकतकराच्या 2018-19अखेर तीन कोटी रुपये थकबाकी असल्याने आज (मंगळवार) पासुन नगरपरिषदेने विशेष वसुलीची मोहीम सुरू केली आहे. आज दिवसभरात थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंड वाजवून सुमारे साडेसात लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याचे नगरपरिषदेने सांगितले. तर आज झालेल्या कारवाईत सुमारे 20 नळजोड कापण्यात आले.
थकबाकीदारांच्या मिळकतीत असलेले नळ जोडणी खंडित करणे, नगरपरिषेदेकडे मागणी करण्यात आलेले दाखले व तत्सम अनुषंगिक कामे कराचा संपूर्ण भरणा होईपर्यंत स्थगित करणे, तसेच बॅन्ड पथकाद्वारे थकबाकीदारांच्या घरासमोर वाद्य वाजवून मिळकतकर वसुल करणे, त्याचप्रमाणे बुधवार (दि.27) पासून थकबाकीदारांची यादी फ्लेक्‍स किंवा दैनिककांतून प्रसिद्ध करणे व जप्तीची कारवाई रिक्षामधून ध्वनिक्षेपकाद्वारे संबंधितांना जाहीर आवाहन करणे आदी कारवाई नगरपरिषेदेकडून प्रस्तावित असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना थकबाकीदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन धनादेश किंवा रोख स्वरुपाच्या रक्कमा मिळकत कर भरणा करुन नगरपरिषेदस मिळकत धारकांनी व भोगवटा धारकांनी सहकार्य करुन पुढील कटु कारवाई टाळावी असेही ध्वनिक्षपकावरुन सांगण्यात येत आहे. ही कारवाई ही येत्या 31 मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी पालिकेची मार्च एंड विशेष वसुली मोहीमही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिकदृष्ट्या हितावह जरी असली, तरी कित्येक मिळकतधारकांना वर्षभर नळाद्वारे दिले जाणारे पाणी कर भरून देखिल अनियमितपणे व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक मिळकतधारकांनी वसुली अधिकाऱ्यांकडे मांडल्यावर अधिकारी निरुत्तर होते. आज वसुली पथकामार्फत दत्त मंदिर रोड, चऱ्होली खुर्द रस्ता येथे विशेष वसुली अधिकारी के. एल. तरकासे, आर. टी. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली राम खरात, किशोर तरकासे, रामदास भांगे, दत्तात्रय सोनटक्के, रमेश थोरात व भागवत सोमवंशी आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

  • त्या करदात्यांसाठी खास ऑफर
    मुदतपूर्व करांचा भरणा करणाऱ्या करदात्यांना कराच्या एकूण रक्कमेवर एक टक्का विशेष अशी सूट देण्यात आलेली आहे. यापुढे 100 टक्के मुदतपूर्व कराचा भरणा करणाऱ्या करदात्यांना आळंदी पालिकेतर्फे एक वर्षासाठी एक रुपयाही न घेता दळण दळून व मसाला कांडून दिले जाईल, असा संकल्प पालिकेने सोडलेला आहे.
  • आळंदीत सुरू असलेल्या कर वसुली मोहिमेत सर्वसामान्य, बड्या धेंड्यांसह कोणाचीही गय केली जाणार नाही, कायदा सर्वांसाठी एकच आहे.
    – आर. टी. खरात , विशेष वसुली अधिकारी, आळंदी नगरपरिषद
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)