आल इज वेल

  नीती अनीती

स्थळ – दिल्लीतील मुख्यमंत्री निवास; वेळ – माफी मागण्याची

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खोलीत मंद प्रकाश. साहेब सोफ्यावर रेलून बसलेत. माफी मागून आलेला थकवा व फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी एफएमवर गाणे लावले. “थ्री इडियटस’ मधील गाणे सुरू झाले…
“जब लाईफ हो आऊट ऑफ कंट्रोल, ओ होठों को करके गोल,
होठों को करके गोल सिटी बजा के बोल… आल इज वेल…’
गाण्यात गुंग होऊन केव्हा सिटी वाजवायला लागले, हे साहेबांना कळलेच नाही. खरंच, लाईफ किती “आऊट ऑफ कंट्रोल’ झाले आहे बरं! दररोज सकाळी उठलं की प्रातर्विधी उरकल्यासारखी माफी पण मागायची. तरच पोट स्वच्छ झाल्याचा फिल येतो. छ्या… साहेब रागाने हात झटकणार इतक्‍यात फोनची घंटा वाजते. साहेब चिडूनच फोन उचलतात.
‘हॅलो… कोण दुखावलयं? कुठला खटला मागे घ्यायचाय? कुणाची माफी मागू आता?’
‘एक्‍सट्रीमली सॉरी अरविंदजी, पण ही योग्य वेळ नाही का बोलायला? सॉरी अगेन…’
‘अरेच्चा! तुम्ही पण सॉरी म्हणतायं? मला तर वाटलं होतं की, मीच एक अभागी आहे ज्याला सॉरी म्हणावं लागतंय. आपण कोण?’
‘मी पण सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेला आहे. मार्क झुकेरबर्ग. फेसबुक माझंच.’
‘अरे वा. प्लीजंट सरप्राईज. तुम्ही पण सध्या माफीच्या साथीचे बळी आहात ना?’
‘येस. तुमच्या देशातील युजरमुळे माझ्या घरचा किराणा भरतो अरविंदजी…’
‘गुड सेंस ऑफ ह्युमर मार्कभाई. आणि माझ्या राज्यात तर जास्तच आहेत युजर. लाईट बिल निम्मे केल्याने लोक सोशलवरच असतात.’
‘आय नो स्पेशल थॅंक्‍स टू यू टू !’ थॅंक्‍स ऐकण्याची सवय नसल्याने साहेबांचा कंठ दाटून येतो. घालमेल जाणवून पलीकडून पुन्हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न होतो.
‘टेल मी, व्हेअर इज युवर गॉडफादर? वुई मिस हीम फ्रॉम 2014. इज ही ओके ?’
‘अण्णाजीची आठवण आली होय? येस. खूप दिवसांनंतर तेही ऍक्‍टिव झालेत. दिल्लीलाच आलेत सध्या. त्यांना ही भेटायचेय. हो मार्कभाई, त्यांचीही माफी मागून पवित्र होतो.’
‘यू नॉटी अरविंद! पण काहीही म्हणा हं. आपण तिघेही वेगवेगळ्या वाटा निवडणारे, पारंपरिक वाटा सोडून जगणारे. हो ना ?’
‘येस मार्कभाई, आमिरभाईचा त्यावर एक चित्रपटही होता… नाव नाही सांगणार, आपला अपमान असेल तो. त्यात “आल इज वेल’ नावाचं एक गाणं होतं बघा. हॅव यू सीन द मुव्ही?’
‘येस, एक्‍सलंट वन. ग्लोबल ऍक्‍टर आहे तो. चला, तुम्ही अण्णाची माफी मागा, मी रविशंकरजीची माफी मागतो. नंतर सोशल मीडियावर तुमचे व अण्णांचे फोटो वायरल करायचे आहेत. टेक केयर. “आल इज वेल, आल इज वेल…’
पलीकडून फोन कट होतो. साहेब ड्रायव्हरला आवाज देतात.
‘रामलीला जाना है दस मिनट बाद…!’
आणि अशा प्रकारे सगळेजणच ” आल इज वेल’चा गजर करू लागतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)