आल्याचे दर वधारले

पिंपरी – दैनंदिन जीवनात उपयोगी मानल्या जाणाऱ्या आल्याची आवक घटल्याने त्याच्या दरातही किलो मागे 10 रूपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती आसिफ बागवान यांनी दिली.

दोन महिन्यापूर्वी आल्याच्या दरात 10 रूपयांची वाढ झाली होती. आता परत एकदा आल्याच्या दरात वाढ झाली असल्याने नागरिकांची मागणी कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हॉटेल व्यावसायिक आणि चहा टपरीवाल्यांकडून आल्याची मागणी घटली आहे. यामुळे याचा फटका विक्रेत्यांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या हे दर 75 रूपये किलो झाले आहे. गेल्या आठवड्यात 60 ते 65 रूपये किलो होते. आल्याची सर्वाधिक आवक सातारा आणि बेंगलोर येथून केली जाते. सातारा येथील आल्याचे दर बेंगलोरच्या आल्यापेक्षा जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बेंगलोरच्या आल्याचे दर गेल्या आठवड्यात 55 रूपये किलो होते. आता त्याच्या दरात वाढ झाली असून ते 65 रूपये किलोने विकले जात आहे. येत्या काही दिवसात आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्‍यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)