आलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयित ताब्यात  

नवी दिल्ली – केंद्रीय गुन्हा अन्वेषणमधील (सीबीआय) भ्रष्टाचारावरुन सुरु असलेल्या कलहाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या चारही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत. महत्वाचे म्हणजे चारही संशयितांकडून इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) ओळखपत्र मिळाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहितीनुसार, चारही संशयित रात्रीपासून आलोक वर्मा यांच्या घराच्या फेऱ्या मारत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आलोक वर्मा यांचं सुरक्षारक्षकांनी चौघांना ताब्यात घेतले व दिल्ली पोलिसांकडे सुपूर्त केले.

दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने दोघांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविले आहे. अलोक वर्मा यांचा कार्यभार केंद्र सरकारने संयुक्त निर्देशक एम नागेश्वर राव यांच्याकडे दिला आहे. तर  राव यांनी पदभार स्वीकारताच 13 अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)