आलोक वर्मा यांच्याविरोधातील चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – केंद्रीय गुन्हे अन्वेषणाच्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सक्तीच्या रजेवर असणारे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची चौकशी सीव्हीसीने दोन आठवड्यात पूर्ण  करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही चौकशी निवृत्त्त न्यायाधीशाच्या निरीक्षणाखाली करण्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, तोपर्यंत प्रभारी संचालक एम. नागेश्वर यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश एस. के. कौल आणि न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठाने  आलोक वर्मा  यांच्या याचिकेवर आज सुनावणी केली. यावेळी आलोक वर्मा यांच्यासाठी वरिष्ठ वकील आणि प्रख्यात कायदेतज्ञ फली एस. नरीमन यांनी तर केंद्राच्या वतीने के. के. वेणुगोपाल यांनी आपली बाजू मांडली आहे. न्यायालयात सुनावणी चालू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नेतृत्वाखाली मोर्चा निघाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)