आले सणवार, सजवूया घरदार (भाग-२)

दसरा-दिवाळी म्हटले की घराची स्वच्छता आणि सजावट यांना सारखेच महत्त्व असते. प्रत्येकाला घराची सजावट थोडी निराळी हवी असे वाटते त्यात काही वावगेही नाही. घरी येणाऱ्या पाहुण्यांची सजावटीची तारीफ केली की आपल्यालाही बरे वाटते. घराची सजावट पूर्णच बदलायची असेल तर भरपूर पैसा लागतो मात्र थोडी कलात्मकता आणि सर्जनशीलता वापरून कमी खर्चातही घराची खूप छान सजावट होऊ शकते.

आले सणवार, सजवूया घरदार (भाग-१)

आरशामुळे नवा लूक : घरात केवळ चेहरा पाहण्यासाठी आरसा किंवा शृंगार करण्यासाठी आरसा वापरला जात नाही. तर त्याचा वापर घराच्या सजावटीसाठी देखील केला जाऊ शकतो. योग्य प्रकारे आरसे लावले तर घराच्या सौंदर्यात वृद्धीच होते. बाजारात हजारो प्रकारचे आरसे विविध किंमतीत उपलब्ध आहेत. सर्वांत पहिल्यांदा घरात आरसा लावण्यासाठी एक योग्य जागा निवडा. घराच्या प्रवेश द्वारी किंवा बेडरूममध्ये लावू शकता. बाजारात अनेक आकारात जसे गोल, ओव्हल, चौकोन, क्राऊन टॅप आणि ऍबस्ट्रॅक्‍ट प्रकारातील आरसे असतात. व्हिंटेज फ्रेम बरोबर आरसा लावल्यास तो चांगला वाटतो. खोलीदेखील सुंदर दिसू लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश असावा योग्य : घरात योग्य पद्धतीने प्रकाशयोजना केल्यास घर चमकदार आणि लांब रुंद दिसते. प्रकाश योजनेसाठीही खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. दिवे निवडताना योग्य गोष्टी लक्षात ठेवा. बेडरूमसाठी नेहमीच मंद आणि डोळ्यांसाठी आरामदायी असाच प्रकाश असला पाहिजे. बेड, कपाट आणि आरसा यांच्यासाठी वेगवेगळे आरसे असले पाहिजेत. बैठकीच्या खोलीसाठी फोकस लाईट लावावा. त्याशिवाय हॅंगिंग आणि फ्लोअर लाईटही घराच्या सजावटीमध्ये प्रभावी ठरतात.

फुलांची करा सजावट : खोलीचे सौंदर्य वाढवण्यासाठी फुलदाणीत ताजी फुले ठेवावीत. ताज्या फुलांव्यतिरिक्त घराच्या आत ठेवण्याची फुलझाडे लावल्यास सुंदर दिसते. ह्या फुलांमध्ये वातावरण स्वच्छ होते. सकारात्मक ऊर्जाही मिळते.

मेणबत्त्यांची सजावट : मेणबत्त्यांचा वापर केवळ वीज गेल्यावर प्रकाशासाठी केला जात नाही तर त्याचा वापर सजावटीसाठी वापरल्या जातात. घराच्या एका भागात मेणबत्त्यांची सजावट करू शकतो. साईड टेबल वर विविध रंग आणि मेणबत्त्या ठेवू शकतो. हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या सेंटेड मेणबत्त्या आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी होते.

– विजयालक्ष्मी साळवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)