आले, भेंडी, दुधी, काकडी, पावटा, मटार, घेवड्याच्या भावात घट

सलग दुसऱ्या आठवड्यात 200 ट्रक फळभाज्यांची आवक

पुणे – मार्केट यार्डात सलग दुसऱ्या आठवड्यात तब्बल 200 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात काढणी झाल्यामुळे आवक जास्त होत आहे. त्यामुळे आले, भेंडी, दुधी, काकडी, पावटा, मटार, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील भाजीपाला विभागात सुमारे 200 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या शेतीमालामध्ये कर्नाटक येथून 2 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून चार ते पाच ट्रक कोबी, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून 18 ते 20 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश, इंदौर येथून 5 ते 6 टेम्पो गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1500 ते 1600 पोती, टॉमेटो पाच ते साडे पाच हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, भेंडी 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, भुईमूग 150 पोती, कांद्याची 70 ते 80 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 50 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-130, बटाटा : 130-180, लसूण : 150-300, आले : सातारी: 350-400, भेंडी : 100-250, गवार : 250-350, टोमॅटो : 60-100, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 200-300, दुधी भोपळा : 80-120, चवळी : 140-160, काकडी : 60-100, कारली : हिरवी 200-250, पांढरी : 140-150, पापडी : 200-220, पडवळ : 150-160, फ्लॉवर : 60-100, कोबी : 80-120, वांगी : 150-250, डिंगरी : 150-160, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 200-220, जाड : 90-100, शेवगा : 300-400, गाजर : 120-160, वालवर : 250-300, बीट : 80-120, घेवडा : 200-400, कोहळा : 100-150, आर्वी : 250-300, घोसावळे : 140-150, ढेमसे : 200-300, भुईमूग : 250-350, पावटा : 180-200, मटार : 350-400, परराज्य : 300-350, तांबडा भोपळा : 60-100, कैरी : तोतापुरी : 160, गावरान : 100-250, सुरण : 240-250, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)