आलेगाव-स्वामी चिंचोली रस्त्यासाठी 1 कोटीचा निधी

आमदार ऍड. राहुल कुल यांची माहिती : मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केला पाठपुरावा

देऊळगाव राजे – आलेगाव-बोरीबेल-मलठण-स्वामीचिंचोली रस्त्याच्या 11 किलोमीटर लांबीची सुधारणा आणि मजबुतीकरण करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या सन 2018 -2019 च्या अर्थसंकल्पात सुमारे 1 कोटी 65 लक्ष रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी दिली.

नुकताच राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधामंडळात सदर करण्यात आला. यावेळी आमदार ऍड. कुल यांनी दौंड तालुक्‍यातील शेतकरी आणि नागरिकांची दळणवळणाची सोय लक्षात घेता विविध रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये एकूण 14 रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये या रस्त्यासाठी देखील 1 कोटी 65 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे आलेगाव, बोरीबेल आणि मलठण गावातील सुमारे 11 किलोमीटर रस्त्याची मजबुती आणि सुधारणा करण्यात येणार आहे.

दौंड तालुका हा अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात सर्वात पुढे राहिला आहे. सुमारे 53 कोटी रुपयांचा निधी सन 2018-2019 च्या अर्थसंकल्पात दौंड तालुक्‍याला मिळाला आहे. या कामांमुळे पुढील काळात विकासकांमाना अधिक गती मिळणार आहे. तसेच रस्ते अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे आमदार ऍड. कुल यांनी यावेळी सागितले. या कामाबाबत जागृत राहून काम दर्जेदार होण्यासाठी सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील आमदार ऍड. कुल यांनी यावेळी केले. एकंदरीतच आलेगाव-बोरीबेल-मलठण-स्वामीचिंचोली रस्त्याच्या कामासाठी सुमारे 1 कोटी 65 लक्ष मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)