‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. एलजीबीटी  (lesbian,gay,bisexual,transgendr) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. या निर्णयाचे स्वागत देशभरातील सेलिब्रिटीज तसेच सामान्य नागरिकांकडून होत असून, देशभरात जल्लोष देखील करण्यात येत आहे.

दरम्यान बॉलिवूडची आघाडीची नायिका आलिया भट्ट हिने देखील ट्विटरद्वारे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “प्रेम हे प्रेम असत! भारताच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे! धन्यवाद!” असे ट्विट करत तिने एलजीबीटी कम्युनिटीला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)