आलिया-वरूणची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन यांची ऑनस्क्रिन जोडीने खुपच धम्माल केलेली आहे. “स्टुडंट ऑफ द ईयर’, “हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, “बद्रीनाथ की दुल्हनिया’ यासारखे सुपरहिट चित्रपट या दिले आहेत. आता ही ऑनस्क्रिन जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डेव्हिड धवनच्या आगामी “कुली नंबर वन’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण आणि आलिया ही जोडी झळकणार आहेत. रोहीत धवन या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. या चित्रपटात सुरुवातीला सारा अली खान भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या चित्रपटात आता आलियाची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी डेव्हिड धवनसोबत वरूण धवनने “जुडवा-2′ आणि “मै तेरा हिरो’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता “कुली नंबर वन’च्या रिमेकमध्ये पुन्हा एकदा वरूण धवन वडिलांच्याच चित्रपटात झळकणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आलिया आणि वरूण दोघेही सध्या “कलंक’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. त्यासोबतच रेमोच्या चित्रपटातही वरूण धवन झळकणार आहे. तर, आलिया ही “ब्रम्हास्त्र’ आणि “गली बॉय’ चित्रपटात दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)