आलिया-रणबीरचा जुनमध्ये साखरपुडा?

गतवर्षी बॉलीवुडमधील अनेक स्टार अभिनेता आणि अभिनेत्री विवाहबंधनात अडकले. यात रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा-निक जोन्स यांचाही समावेश आहे. तसेच सोनम कपूर आणि आनंद आहुजा हेही आपल्या विवाहीत जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यातच आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच साखरपुडा करणार असल्याचे समजते.

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर-आलिया या कपल्सची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. हे दोघेजण यावर्षी जून महिन्यात साखरपुडा करणार आहेत. तसेच हे दोघे आपल्या आगामी “ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनानंतर विवाहबंधनात अडकणार आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे एकमेकांच्या कुटुंबियांसमवेत अनेकवेळा एकत्रित दिसून आले आहेत. रणबीरची आई नीतू कपूरने अनेकवेळा आलिया भट्ट सोबचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले आहेत.

दरम्यान, रणबीर-आलिया हे सध्या “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तसेच आलिया भट्टचा आगामी चित्रपट “गली बॉय’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंहची जोडी झळकणार आहे. हा चित्रपट “व्हॅलेंटाइन्स डे’च्या वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)