आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

“राजी’तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होते आहे. आता तिचे कौतुक करायला आणखी एक छान कारण तिने दिले आहे. आलिया आपल्या वॉरड्रोबमधल्या काही फेव्हरेट कपड्यांचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारे सगळे पैसे एका स्वयंसेवी संस्थेला देणगी म्हणून दिले जाणार आहेत. ही संस्था प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून त्याच्या आधारे सौर उर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प चालवते. या सौर उर्जेचा वापर ज्या ग्रामीण भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही, तेथे केला जाणार आहे.

आपल्या या निर्णयाविषयी बोलताना आलियाने सांगितले की तिला पर्यावरण संतुलनाच्या कामामध्ये विशेष रस आहे. पर्यावरणाची सर्वाधिक हानी प्लॅस्टिकमुळे होत असते. त्यामुळे प्लॅस्टिकचे पुनर्निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेला मदत व्हावी म्हणून आपल्या फेव्हरेट कपड्यांचा लिलाव करणार असल्याचे तिने सांगितले. तिने या लिलावाचे नाव “माय वॉरड्रोब इज शू वॉरड्रोब’ असे नाव दिले आहे.

आपल्या वॉरड्रोबमधील कपड्यांचा लिलाव करण्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून तिच्या मनात विचार घोळत होता. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून तिने इतकी प्रचंड शॉपिंग केली आहे, की आता तिच्याकडे जागाच शिल्लक राहिलेली नाही. खरेदी केलेल्या कपड्यांपैकी कित्येक कपडे तर तिने कधी घातले होते की नाही, हे देखील तिला आठवत नाही. तिने आपले कपडे कोणाला गिफ्ट देखील केलेले नव्हते. त्यामुळे या कपड्यांच्या साठ्याचे करायचे काय,हा तिच्यासमोर एक प्रश्‍नच होता. अलियाला तर कपड्यांची एवढी हौस आहे की कोणतीही नवीन स्टाईल आली की ती लगेच ड्रेस घेते. पण या नव्या कपड्यांचा तिला लवकरच कंटाळाही येतो. ब्रॅण्डपेक्षा नवीन स्टाईल आणि त्यातही आरामदायक कपडे तिला विशेष पसंत असतात. म्हणूनच तिला “स्टॉक क्‍लिअर’ करायचा आहे. म्हणजे ती स्वतःसाठी आणखीन नवीन कपडे घेऊ शकेल. हा लिलाव शनिवार आणि रविवारी खारच्या नाईट मार्केटमध्ये होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)