आलिया आणि रणबीरच्या अफेअरचा सिद्धार्थ मल्होत्राला त्रास

आलिया भट आणि रणबीर कपूरमधील अफेअरला आता त्यांच्या कुटुंबीयांकडूनही अप्रत्यक्षपणे मंजूरी मिळाली आहे. त्यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू आहे. आलिया स्वतः मात्र रणबीरबरोबरच्या नात्याला कोणतेही नाव देण्यास तयार नाही. अफेअरशी संबंधित कोणत्याही चर्चेमध्ये ती सहभागीही होत नसते. तिने कोणालाही यासंदर्भात काहीही सांगितलेलेही नाही. तिचे नाव पूर्वी वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राबरोबरही जोडले जायचे. याच सिद्धार्थ मल्होत्राला मात्र आलिया आणि रणबीर कपूरच्या अफेअरचा फार त्रास व्हायला लागला आहे.

रणबीर आणि आलिया जवळ आल्यापासून सिद्धार्थ आणि आलियामध्ये अंतर वाढायला लागले आहे. स्वतः सिद्धार्थच आता आलियाला टाळायला लागला आहे. एका इव्हेंटमध्ये हे दोघे आमने सामने आले होते, तेंव्हा सिद्धार्थने आलियाला बघूनही न बघितल्यासारखे केले होते. आलियाने सिद्धार्थकडे बघून स्मितहास्य करण्याचा प्रयत्न केला पण सिद्धार्थने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दुसरीकडे रणबीर कपूरचेही नाव आलियाच्या आगोदर कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणशी जोडले गेले होते. मात्र त्याने मात्र आपली सगळी अफेअर सोयीस्करपणे गुंडाळून ठेवली आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)