आलिया आणि कतरिनाची दोस्ती धोक्‍यात नाय

आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्यातील दोस्ती सर्वश्रुत आहे. दोघींनी एकमेकींबरोबर आपली सिक्रेट शेअर केली आहेत. दोघींमध्ये जबरदस्त ट्युनिंग आहे. या दोघींमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे रणबीर कपूर. आता ही बाब काही लपून राहिलेली नाही. दोघींनी आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळ वेगळा आहे, ही बाब मान्य केलेली आहे. मात्र, आता या दोस्तीमध्ये दरार पडायला सुरुवात झाली होती.

करण जोहरचा शो “कॉफी विथ करण’मध्ये या दोघी आपापल्या लव्हलाईफबद्दल खुलेपणाने बोलणार आहेत. त्यामध्ये त्यांचा अॅप्रोच कसा असेल, याबाबत उत्सुकता आहे. त्याशिवाय कॅटने आलिया आणि रणबीरबाबत एक भाकित वर्तवले होते. या दोघांचे लव्हलाईफ फार काळ टिकणार नाही, असे तिने म्हटले होते. अर्थात त्यामध्ये रणबीरच्या स्वभावाला तिने गृहित धरले होते.

-Ads-

जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रणबीर आणि कतरिना लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे हे ब्रेकअप तिच्या जिव्हारी लागले असणारच. पण तिच्या वक्‍तव्यामुळे आलियाला मात्र यामुळे थोडे दुःख झाले असणारच. याचदरम्यान कतरिनाने आलियाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि आपल्यातले रिलेशन किती चांगले आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोला आलियाने लाईक केले आहे. तसे ती कोणाही बरोबर फार काळ अबोला धरू शकत नाही. कदाचित कतरिनाकडून आलियाशी थोडे अंतर ठेवले जाऊ शकले असते. मात्र आलियाकडून मात्र तसे काहीही झाले नसते. कतरिनाने घेतलेल्या पुढाकाराला आलियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे दोघींमधील नाते अजून पूर्णपणे संपलेले नाही, हे लक्षात येते. विशेषतः या दोघींचे हसणारे चेहरे बघितले की आपापल्या लव्ह लाईफचा आपल्या दोस्तीवर काहीही परिणाम त्यांनी होऊ दिलेला नाही, हे सहज लक्षात येते.

कतरिना सध्या सलमानबरोबर “भारत’मध्ये तर आलिया रणबीरबरोबर “ब्रह्मास्त्र’ आणि “कलंक’मध्ये शुटिंग करते आहे. याशिवाय करण जोहरच्या “तख्त’ या मल्टिस्टारर फिल्ममध्येही ती आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)