आलियाला “दिल चाहता है’चा रिमेक करायचाय

आलिया भटचा बॉलिवूडमधील सक्‍सेस रेट सर्वात जास्त आहे, असे मानले जाते. सध्या ती “राजी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. तिला हिरोईनचे सेकंडरी रोल करण्याचा कंटाळा आला आहे, असे नाही. मात्र बॉलिवूडमध्ये पूर्ण हिरोईन लीड ऍक्‍टचा सिनेमा बनायला हवा, अशी तिची अपेक्षा आहे. करीना कपूर आणि सोनम कपूरच्या बरोबर होत असलेला “वीरे दी वेडिंग’ हा सिनेमा असा सगळ्या नायिकाच केंद्रस्थानी असलेला सिनमा आहे. अशाच स्वरुपाचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये निर्माण व्हायला हवा, अशी आलियाची अपेक्षा आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या सिनेमामध्ये एकापेक्षा अधिक हिरो असू शकतात, अगदी त्याच प्रमाणे मल्टी हिरोईन असलेले सिनेमे बनायला हवेत. बॉलिवूडमध्ये अशाप्रकारचे केवळ अभिनेत्रींचेच सिनेमे खूपच कमी बनले आहेत. जे आहेत तेही अगदी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. “आयेशा”, “पार्च्ड’ आणि “निल बटे सन्नाटा’ हे अशापैकीच काही सिनेमे होते. त्याच्यानंतर थेट “गुलाब गॅंग’सारखा एखाद दुसरा सिनेमाच आठवता येऊ शकतो. आलियाने स्वतः “उडता पंजाब’ या मल्टी हिरोईन सिनेमामध्ये काम केले आहे. एकावेळी दोन नायिका असलेल्या सिनेमात काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. पण आता सगळ्याच नायिका असतील, अशा सिनेमामध्ये काम करण्याची ईच्छा असल्याचे अलिया म्हणाली.

कतरिना आणि दीपिका या आलियाच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी कधी ना कधी माझ्याबरोबर एका सिनेमात काम करायचे आहे, हे आलियाने या दोघींकडून कबूल करून घेतले आहे. मात्र अशा नायिकाप्रधान सिनेमाची चांगली स्क्रीप्ट आलियाला मिळालेली नाही. जर अशी चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नकार द्यायचा नाही, असे आलियाने ठरवून टाकले आहे. जर केवळ हिरोईनना घेऊन “दिल चाहता है’चा रिमेक बनवायचे ठरले तर कसे वाटेल ? आता बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींसाठी रोल आणि स्क्रीप्ट लिहीली जायला लागली आहे. त्यामुळे हा हिरोईन स्पेशल रिमेक बनायला काहीच हरकत नाही, असे आलिया म्हणते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)