आलियाच्या कॉल्सला रणबीर कंटाळला

प्रियांका आणि दीपिकाचे लग्न झाले. आता रणवीर आणि आलियाच्या लग्नाचा मुहुर्त मिडीयामधूनच काढायला सुरुवात झाली आहे. रणबीर व आलिया यांचे नाते आता जगजाहीर झाले आहे. रणबीर बरोबर वेळ घालवण्याची एकही संधी आलिया सोडत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे काही तरी बिनसले आहे. आलियाला रणबीरची सोबत आवडत असल्याने ती सतत त्याला कॉल व मेसेज करत असते. नेमके हेच रणबीरला आवडत नाही. रणबीरचे वडील ऋषि कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत.

रणबीर व नीतू कपूरही त्यांच्या सोबत आहेत. तेव्हापासून आलियाचे अमेरिकेचे दौरेही वाढले आहेत. ती सतत नीतू कपूर यांच्या संपर्कात आहे. त्याचप्रमाणे ती रणबीरलाही सतत कॉल करत असते. कॉल उचलला नाही तर ती त्याला एकापाठोपाठ एक असे भरमसाठ मेसेज पाठवते. मेसेजला रिप्लाय नाही दिला तर ती रणबीरबरोबर हुज्जतही घालते. यासगळ्याला रणबीर कंटाळला आहे. वडिलांची तब्येत बरी नसल्याने तो सध्या तणावातही आहे. पण संपर्कात राहिल्यानेच प्रेम वाढते, असं आलियाचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)