आलियाचा जुना बॉयफ्रेंड आणि रणबीर कपूर आमने सामने 

अलिकडेच शाहरुख खानने दिवाळीनिमित्त दिलेल्या पार्टीमध्ये आलिया आणि रणबीरची माजी गर्लफ्रेंड कतरिना कैफ एकत्र आल्या होत्या. एकमेकींना टाळणे शक्‍य नव्हते. पण ही भेट दोघींसाठी अगदी अस्वाभाविक अशीच होती. दोघींनी एकमेकींबरोबर थोड्या गप्पा मारल्या. एकत्र फोटो काढले आणि नंतर दोघी अन्य गेस्टशी बोलायला वेगवेगळ्या निघून गेल्या. याच पार्टीमध्ये आलियाचा एक्‍स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणबीर कपूरही आमने सामने आले होते.

दोघांना मात्र ही स्थिती नीट हाताळता आली नाही. दोघांनी एकमेकांशी शेकहॅन्ड केले आणि लगेचच दुसऱ्या दिशेला तोंड करून वेगवेगळ्या दिशांना निघूनही गेले. आपल्या गर्लफ्रेंडचा एक्‍स बॉय फ्रेंड आणि आपल्या गर्ल फ्रेंडचा एक्‍स बॉय फ्रेंड अशाप्रकारे एकाचवेळी समोर येतील, याची कदाचित आलिया आणि रणबीर या दोघांनाही कल्पना असावी. बॉलिवूड पार्टीमध्ये अशी वेळ येणे अगदी स्वाभाविक आहे. इतके दिवस कतरिनाशी आपले काही बिनसलेले नाही, असे सांगणारी आलियाही या प्रसंगामुळे थोडी बावरून गेली. तर कतरिनाला आलियाशी बोलताना बघून रणबीरही खजील झाला असावा. मात्र यावर सिद्धार्थ मल्होत्राची प्रतिक्रिया काय होती, हे समजू शकलेले नाही. कतरिनाने तर आपल्या भावना पूर्वीच स्पष्ट केलेल्या आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)