आलमे येथे रंगल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा

ओतूर-बल्लाळवाडी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलमे (ता. जुन्नर) येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाल्या.
कार्यक्रमाची सुरूवात विद्येची आराध्यदेवता असलेल्या सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आलमे गावचे सरपंच परशुराम गोपाळे होते. उपस्थितांमध्ये विस्तार अधिकारी संजय जाधव, उपसरपंच गोविंद घोगरे, त्याचबरोबर पोलीस पाटील निलेश घोगरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जालिंदर फोडसे, अनंथा शिंदे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस हनुमंत गोपाळे, शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नीतिन नहिरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानबाबा फोडसे तसेच शेखर नायकोडी, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांनी क्रीडा स्पर्धेच्या प्रत्येक क्रमांकासाठी भरघोस अशी बक्षिसेही दिली. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यानिमित्ताने शाळेचे शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेसाठी प्राप्त झालेल्या रुपये पंचवीस हजार रुपये किंमतीच्या स्पीकर सिस्टिमचे उदघाटन करण्यात आले. सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी, चेंडूफेक, गोळा फेक, कबड्डी, खोखो, लेझीम, भजन या स्पर्धा कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून पार पडल्या. या स्पर्धेसाठी आलमे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि आलमे ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. आलमे गावचे ग्रामस्थ संतोष नायकोडी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींना दुपारच्या आहारामध्ये मसाले भात व शिऱ्याचा आस्वाद दिला. सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू-भगिनींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)