ओतूर- जुन्नर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा आलमे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून माता-पालक मेळावा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. माता-भगिनींना स्वच्छतेचे महत्व तसेच मुलामुलींच्या शिक्षणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. तसेच वर्गात आपल्या पाल्याशेजारी बसून त्याच्या प्रगतीविषयी वर्गशिक्षकांबरोबर चर्चा केली. शाळेत सुरु असलेले विविध शैक्षणिक उपक्रम पाहून सर्व माता-पालकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सोमनाथ गोपाळे, सर्व सदस्य तसेच सरपंच परशुराम गोपाळे, मुख्याध्यापक मारूती शेळके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)