आलमे जिल्हा परिषद शाळेस चार संगणक प्रदान

ओतूर -जुन्नर तालुक्‍यातील आलमे येथील जिल्हा परिषद शाळेस लोकसहभागातून चार संगणक संच सोमवारी (दि. 26) अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी प्रदान करण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मारूती शेळके यांनी दिली. हटकेश्वर फाउंडेशन आलमेकडून दोन, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस हनुमंत गोपाळे यांच्याकडून एक व सांस्कृतिक कार्यकमाच्या बक्षीस रकमेतून एक असे एकूण चार संगणक संच मिळाले.

या कार्यक्रम प्रसंगी सरपंच परशुराम गोपाळे, उपसरपंच गोंविद घोगरे, हटकेश्वर फाउंडेशनचे सदस्य निलेश फोडसे, अनिल हुळवळे, रामदास हुळवळे, भगवान फोडसे, एकनाथ शिंदे, विश्वास शिंदे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उपेंद्र डुंबरे, माजी अध्यक्ष रवींद्र वाजगे, चंद्रकांत डोके, अंबादास वामन, प्रशांत गोपाळे, हरिदास शिंदे, जनसेवक सहकारी पतसंस्था घाटकोपरचे अध्यक्ष चंद्रकांत हुळवळे, बाळासाहेब नायकोडी, राजेंद्र नायकोडी, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष महादेव फोडसे, मिननाथ फोडसे, तंटामुक्‍ती अध्यक्ष रायबा घोगरे, अनंथा शिंदे, सुरेश फोडसे व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलमे शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून लॅमिनेशन मशीन शाळेला भेट दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)