आर.पी.एफ.पुणे ने रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणाऱ्यास केले जेरबंद

आर.पी.एफ.पुणे ने रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणाऱ्यास केले जेरबंद

पुणे,दि.2-रेल्वेमध्ये दोन मोठ्या चोऱ्या करणाऱ्यास सराईत गुन्हेगारास आरपीएफच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यात 5 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. हा चोरटा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून पुण्यात चोरी करण्यासाठी येत असे. यासाठी तो एसी डब्यातून आरक्षण करुन प्रवास करत होता.

आर.पी.एफ.पुणेचे वरिष्ठ विभागीय आयुक्त विकास ढाकने व सहायक आयुक्त मकारीरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांच्या बॅग /पर्स चोरी करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी आर.पी.एफ. च्या कर्मचार्ऱ्याचे पथक तयार केले होते .दिनांक 07/07/2018 रोजी गाडी संख्या 16209 अजमेर -मैसूर एक्‍सप्रेस गाडी च्या ए.सी.डब्यातुन एक लेडीज पर्स चोरी गेली होती त्यामध्ये रोकड ,डायमंड ,सोन्याचे दागिने एकूण रुपये 7,58,499/- एवढा ऐवज चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता .त्या गुन्ह्यांतील आरोपीच्या शोधासाठी पुणे स्टेशन येथे लावलेल्या सीसीटव्ही फुटेजच्या आधारा वरून आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यावरुन मोहम्मद अल्लाबक्ष मोहम्मद इसमाईल ( 19,रा. गुलबर्गा कर्नाटक) याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यात चोरीची एक लेडीज पर्स व जेन्ट्‌स पर्स भेटली. त्यामध्ये रोख रक्कम ,हिरे ,सोन्याचे दागिने ,मोबाईल ,अन्य दस्तावेज असा एकूण 5,14,200/- मुद्देमाल मिळून आला .त्याची चौकशी केली असता पकडलेल्या आरोपीने सांगितले की त्याने रविवारी रेल्वे गाडी क्रमांक 16507 भगत की कोटी बैंगलोर एक्‍सप्रेस च्या ए.सी.डब्यातुन पुणे स्टेशन येथून रेल्वे प्रवाशांची पर्स चोरली आहे .त्याबाबत जी.आर.पी.मिरज येथे गुन्हा क्रमांक 236/18 नुसार दाखल झाला असून तो पुणे जी.आर.पी. .ला स्थानांतरित केला गेला आहे . पकडलेला आरोपांनी वरील दोन्ही गाड्यांमध्ये चोरी केल्याचे सांगितले आहे. आरोपीला त्याच्याकडे मिळालेल्या मुद्देमाल सहित जी.आर.पी. स्थानिग गुन्हे अन्वेषण विभागाने पुढील कार्यवाही करीता सुपूर्द केले आहे . ही कार्यवाही आर.पी.एफ. पुणेचे वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबले ,सुनील चाटें ,उपनिरीक्षक विजयपाल सिंह ,संतोष बड़े ,हरीश खोकर ,आर.पी.एफ कॉन्स. विशाल माने ,युवराज गायकवाड यांनी केली आहे .
आरोपी कडून अजून काही गुन्ह्यांची शक्‍यता आहे .आरोपी हा गुलबर्गा कर्नाटक राज्या वरून पुण्याला चोरी करण्या करीता ए.सी.डब्यातुन आरक्षण करून प्रवास करत असे व पुणे येथे येऊन गुन्हे करत असे .कर्नाटक राज्यात आरोपी विरुध्द चोरी चे गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)