आर्सेनल-मॅंचेस्टर युनाइटेड सामना बरोबरीत

मॅंचेस्टर: आर्सेनल विरुद्ध मॅंचेस्टर युनाइटेड यांच्यातील सामना आखेर 2-2 असा बरोबरीत सुटला आहे. या सामन्यात मॅंचेस्टर संघासाठी अँटिनिओ मार्शल आणि जोसे लिंगार्ड याने गोल नोंदवले तर आर्सेनलतर्फे एस. मुस्तफी संघाने गोल नोंदवाला. मार्कोस रोहो याने आत्मघातकी गोल केल्याचा फायदाही आर्सेनल संघाला झाला. मॅंचेस्टर युनाइटेड संघाने दोनवेळा पिछाडी भरून काढत सामना बरोबरीत सोडवला.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. 26व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल एस. मुस्तफीने नोंदवत आर्सेनल संघाला आघाडी मिळवून दिली. परंतु, 30व्या मिनिटला मॅंचेस्टरच्या मार्शलने बरोबरी साधली. त्यानंतर पहिले सत्र संपले.

दुसऱ्या सत्रात मॅंचेस्टरने उत्तम खेळ केला. मार्कोस रोहोने आत्मघातकी गोल केल्यामुळे आर्सेनलला आघाडी मिळाली. परंतु, एका मिनिटाने लिंगार्डने गोल करून पुन्हा मॅंचेस्टर संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर या गोल होऊ शकला नाही. मॅंचेस्टर संघाने आक्रमक खेळ केला तर आर्सेनलने चेंडू आपल्या ताब्यात ठेऊन अचूक पासिंग करण्यावर भर दिला. अख्तर हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)