आर्यन स्कायलार्कस, गोल्डफिल्ड डॉल्फिन उपांत्य फेरीत

इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे: आर्यन स्कायलार्कस, गोल्डफिल्ड डॉल्फिन, ओव्हन फ्रेश टस्कर्स, एनएच वुल्वस या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बाळ कुलकर्णीच्या 25 धावांच्या खेळीच्या जोरावर आर्यन स्कायलार्कस संघाने ट्रूस्पेस जॅगवॉर्स 4 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना आर्यन स्कायलार्कस संघाने 6 षटकांत 5 बाद 76 धावा केल्या. यात अंकुश जाधवने 12 चेंडूत 25 धावा, बाळ कुलकर्णीने 10 चेंडूत 25 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाला 6 षटकांत 2 बाद 72 धावाच करता आल्या. यात नकुल पटेल नाबाद 33, राजेश कासट 21 यांनी दिलेली लढत अपूरी ठरली.

दुसऱ्या सामन्यात रोहन छाजेडच्या नाबाद 57 धावांच्या खेळीच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन संघाने टायगर्स संघाचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत श्रीनिवास चाफळकर(नाबाद 38 धावा व 2-2)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने डी लिंक चिताजचा 49धावांनी पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत एनएच वुल्वस संघाने जीएससी पॅंथर्स संघावर सुपरओव्हरमध्ये 3धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उपांत्यपूर्व फेरी:
गोल्डफिल्ड डॉल्फिन: 6षटकात बिनबाद 97धावा(रोहन छाजेड नाबाद 57(21,4ु4,4ु6), अश्विन शहा नाबाद 37(15, 2ु4,3ु6)) वि.वि.टायगर्स: 6षटकात बिनबाद 94धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 42(25,2ु4,4ु6), मधुर इंगहाळीकर नाबाद 29(14,2ु4,2ु6));सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन 3धावांनी विजयी;

आर्यन स्कायलार्कस: 6षटकात 5बाद 76धावा(अंकुश जाधव 25(12,4ु4,1ु6), बाळ कुलकर्णी 25(10,4ु4,1ु6), नकुल पटेल 2-8, रवी कासट 1-12, निरंजन गोडबोले 1-14)वि.वि.ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 6षटकात 2बाद 72धावा(नकुल पटेल नाबाद 33(16,1ु4,2ु6), राजेश कासट 21(15,2ु6), जयदीप गोडबोले 1-12);सामनावीर-बाळ कुलकर्णी; आर्यन स्कायलार्कस 4धावांनी विजयी.

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात बिनबाद 88धावा(हर्षल गंद्रे नाबाद 48(21,3ु4,4ु6), श्रीनिवास चाफळकर नाबाद 38(16,2ु4,3ु6)) वि.वि.डी लिंक चिताज: 6षटकात 5बाद 39धावा(अक्षय ओक 14, आत्मन बागमार 11, श्रीनिवास चाफळकर 2-2, शिरीष आपटे 2-3, विकास आचालकर 1-10);सामनावीर-श्रीनिवास चाफळकर; ओव्हन फ्रेश टस्कर्स 49धावांनी विजयी;

जीएससी पॅंथर्स: 6षटकात 2बाद 98धावा(सिद्धार्थ बदामीकर 44(14,1ु4,6ु6), कर्णा मेहता 28(13,2ु4,2ु6), अनुज लोहाडे 1-23)वि.एनएच वुल्वस: 6षटकात 3बाद 98धावा(अनुज लोहाडे 54(21,2ु4,6ु6), प्रसाद जाधव 26(11), सिद्धार्थ बदामीकर 1-8, यश परांजपे 1-13);
एनएच वुल्वस: 1षटकात बिनबाद 10धावा(अनुज लोहाडे नाबाद 5, प्रसाद जाधव 4 )वि.वि.जीएससी पॅंथर्स: 1षटकात 1बाद 7धावा(सिद्धार्थ बदामीकर 5, पियुश शर्मा 1-7);सामनावीर-सिद्धार्थ बदामीकर; एनएच वुल्वस 3धावांनी विजयी.

—————————-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)