आर्यन रावला विजेतेपद संडे जलद बुद्धिबळ स्पर्धा

पुणे – डॉल्फीन इंटरनॅशनल शाळेत विश्‍वविजय चेस अकॅडमी यांच्या विद्यमानाने आयोजित केलेल्या चौथ्या संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन राव, वसुधरिनि केशवन, प्रणव भोगावत, बन्सल कुंज तर अभिषेक वर्मा यांनी खुल्यागटाचे, वैष्णवी कल्याणकरने महिला गटाचे तर गिरीष जोशीने पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले आहे.

यावेळी आर्यन रावने 4.5 गुणांसह आठवर्षांखालिल मुलांच्या गटात विजेतेपद पतकावले. तर, वसुधरिनि केशवनने 1239 गुणांकनांसहीत 10 वर्षांखालील गटात 5. 5 गुण मिळवले. तर, प्रणव भोगावत 1058 गुणांकनासह 12 वर्षांखालील गटात 5 गुण मिळवले. बन्सल कुंज 1191 गुणांकन मिळवताना 14 वर्षंखालील गटात 5.5 गुण मिळवले. तर अभिषेक वर्मा 1855 गुणांकन मिळवताना 7. 5 गुण मिळवत खुल्यागटाचे वैष्णवी कल्याणकर 1085 गुणांकन मिळवत 6 गुण मिळवले महिला गटाचेविजेतेपद पटकावले. तर, गिरीष जोशीने 1636 गुणांकन मिळवताना 5. 5 गुणांसह विजेतेपद पटकाविले.
या दिवसाच्या स्पर्धेत आंतराराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे हिच्यासह 42 गुणांकन प्राप्त खेळाडूंसह एकूण 123 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शैलेंद्र मिराशी आणि जेष्ठ खेळाडू दिपक बानगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्पर्धेचे पंच मिलिंद नाईक उपस्थीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

8 व्या फेरीतील सविस्तर निकाल – अभषेक वर्मा 1855 (7 गुण) अनिर्णीत विरुद्ध समिर इनामदार 1764 (6 गुण), आर्यन शहा 1553 (6 गुण), पराभूत विरुद्ध जितेंद्र पाटील 1875 (6 गुण), आकांशा हगवणे 1808 (6 गुण) वीजयी विरुद्ध हिमांशू छाब्रा 1753 (5. 5गुण), सिद्धांत ताम्हणकर 1674 (5. 5 गुण) विजयी विरुद्ध शंतनू मिराशी (5. 5 गुण), सुनील वैद्य 1734 (5 गुण) पराभूत विरुद्ध कुणाल शिंदे 1426 (5. 5 गुण), सोनी ओमप्रकाश 1778 (5 गुण) विजयी विरुद्ध जयवंत देशपांडे 1285 (5 गुण), मलाइल शामकर 1297 5(गुण) पराभूत विरुद्ध प्राणाव टांकसाळे 1648( 5 गुण), आशिका काळे 1128 (5 गुण) पराभूत विरुद्ध पदमानंद मेनम 1608 (5 गुण), प्रसाद चांदोलकर 1529 (5 गुण) विजयी विरुद्ध मलंगे दर्शन (5 गुण), वैष्णवी कल्याणकर 1085 ( 5 गुण) विजयी विरुद्ध प्रवीण माने 1333 (5 गुण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)