आर्यन एफसी, सासवड एफसी तिसऱ्या फेरीत प्रवेश !

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे: आर्यन एफसी ब, सासवड एफसी आणि फिनाक्‍यु गॉग एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांच्या पराभव करताना व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यात आर्यन एफसी ब संघाने परशुरामियन्स्‌ संघाचा टायब्रेकमध्ये 2-1 असा पराभव केला. अतितटीने लढल्या गेलेल्या या सामन्यात पूर्ण वेळ गोलशुन्य बरोबरी झाल्याने टायब्रेक पध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये परशुरामियन्स्कडून राकेश वाल्हेकर याने गोल केला. आर्यन संघाकडून आदित्य पवार आणि निखील डी. यांनी गोल केले. परशुरामियन्स्च्या वेदांत खाके, शशांक सग्गाम, सारंग दातार, ओंकार लिमये यांना गोल मारण्यात अपयश आले.

इम्रान शेख, संगमित्र मिसाळ व हृषिकेश खेडेकर यांनी केलेल्या गोलाच्या जोरावर सासवड एफसी संघाने इन्व्हेडर्स एफसी संघाचा 3-0 असा सहज पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. फिनाक्‍यु गॉग एफसी संघाने पुना सोशल संघाचा 3-0 असा सारख्याच फरकाने पराभव केला. पूर्ण सामन्यात वर्चस्व राखणार्या फिनाक्‍यु संघाकडून श्रीकांत एम.,सुरज थापा व आदर्श आर. यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाचा विजय साकार केला. अव्वल आणि प्रथम श्रेणी गटाच्या झालेल्या सामन्यात सनोज यादव याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर इंद्रायणी एससी संघाने डेक्कन इलेव्हन ब संघाचा 1-0 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

सविस्तर निकाल : पहिली फेरी ः प्रथम आणि अव्वल श्रेणी – इंद्रायणी एससीः 1 (सनोज यादव 42 मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन बः 0,
व्दितीय आणि तृतीय श्रेणी गट ः पहिली फेरी – आर्यन एफसी बः 3 (ओम शेळके 5 मि., आदित्य पवार 24 मि.) वि.वि. नाईटस्‌ इलेव्हनः 0, केशव माधव प्रतिष्ठानः 2 (राज पुजारी 4, 27 मि.) वि.वि. योध्दा एफसीः 1 (आकाश अगरवाल 48 मि.), सुखाई एफसीः 6 (राजू राम 29 मि., अक्षय भालेराव 33 मि., अब्दुल सय्यद, विनय देवरू, राजू राम, रोशन नायर) सडन डेथमध्ये वि.वि. उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड एफसीः 5 (ओंकार कडू 2, 35 मि., मिलींद त्रिवेदी, मल्लिनाथ इलेकर, सोहन राय);(गोल चुकविले- सुखाई- तनिष्क बर्त, अक्षय भालेराव; युकेएम कोथरूड- यश चव्हाण, सुरज नायर, अमित चव्हाण); पूर्णवेळ 2-2.
दुसरी फेरी – आर्यन एफसी बः 2 (आदित्य पवार, निखील डी.) टायब्रेकमध्ये वि.वि. परशुरामियन्स्‌ बः 1 (राकेश वाल्हेकर); गोल चुकविले- आर्यन्स्‌- कानिटकर जी., ऋषभ जे.; परशुरामियन्स्‌- वेदांत खाके, शशांक सग्गाम, सारंग दातार, ओंकार लिमये); पूर्ण वेळ 0-0, सासवड एफसीः 3 (इम्रान शेख 4 मि., संगमित्र मिसाळ 24 मि., हृषिकेश खेडेकर 38 मि.) वि.वि. इन्व्हेडर्स एफसीः 0, फिनाक्‍यु गॉग एफसीः 3 (श्रीकांत एम. 21 मि., सुरज थापा 42 मि., आदर्श आर. 49 मि.) वि.वि. पुना सोशलः 0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)