आर्यन एफसी, ग्रीन बॉक्‍स चेतक संघाची विजयी आगेकूच

पुणे: येथे सुरु असलेल्या गुरु तेगबहादूर फुटबॉल स्पर्धेत वसीम सय्यद आणि शाह फैसल यांच्या गोलच्या जोरावर आर्यन्स एफसी अ संघाने रेंगहोल्स मिळणं संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघानी बचावात्म खेळ करण्यावर भर दिला त्यामुळे पहिला गोल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. 20व्या मिनिटाला शाह फैसलच्या पासवर वसीम सय्यदने गोल करत आर्यन्स संघाला 1-0 आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिले सत्र संपले तोपर्यंत आणखी गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात 40व्या मिनिटाला शाह फैसललने गोल करत आर्यन्स संघाला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सामन्यात ग्रीन बॉक्‍स संघाने रितेश थुबे 2 गोल आणि डी. निसर्ग यांच्या 1 गोलच्या बळावर थंडर्स कॅट्‌स एफसी संघाचा पराभव केला. या सामन्यात ग्रीन चेतक संघाचा दबदबा राहिला. उत्तम आक्रमण आणि भक्कम बचावाच्या जोरावर चेतक संघाने हा सामना 3-1 असे नमविले. अन्य सामन्यात सिटी क्‍लबने सांगवी एफसी संघाला हरवत स्पर्धेत आगेकूच केली. तर परशुरामीयन्स संघाने शिवाजीयन्स संघाचा 2-1 असा निसटता पराभव केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)