आर्थिक सुरक्षिततेच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती साधावी – पुजारी

सांगली – सामान्य जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना अशा योजना सुरू केल्या आहेत. त्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बॅंक योजनाही सुरू केली आहे. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करण्यात येतो व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आर. एस. पुजारी यांनी केले.

सांगली येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती कार्यालय व लोकमान्य कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार अरूण सोनवणे, मिरज तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आर.एस.पुजारी म्हणाले, प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शुन्य बॅलन्सवर बॅंक खाते काढले जात असून या योजनेत 1 लाखाच्या अपघाती विम्याचे संरक्षण दिले आहे. त्याचा कसलाही प्रीमियम खातेदारास भरावा लागणार नाही. तसेच कमीत कमी सहा महिने बचत खात्यावर व्यवस्थित व्यवहार करणाऱ्या स्त्री खातेदारांना (कुटुंब प्रमुख) कमीत कमी 1 हजार ते जास्तीतजास्त 5 हजारापर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्जसुविधेचा अंतर्भाव आहे. ही उघडलेली बॅंकखाती ही शासनाच्या विविध अनुदान योजनांसाठी सहाय्यभूत होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)