आर्थिक साक्षरतेचा अभाव: मनमोहन सिंग 

नवी दिल्ली: देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्याने सोन्याला मोठी मागणी आहे. तसेच आर्थिक समावेशातील दरी वाढत चालली आहे. मन्नापूरम फायनान्सचे संस्थापक व्ही. सी. पद्मनाभन यांनी यात सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न केला. आता त्यात परिवर्तन दिसून येत असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. आता व्ही. पी. नंदकुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा उद्योग देशातील अग्रगण्य एनबीएफसी म्हणून उदयाला आला, असे मनमोहन सिंग म्हणाले.

सिंग यांना पहिला व्ही. सी. पद्मनाभन मेमोरियल लाईफटाईम अचिव्हमेंट ऍवार्ड मिळाला असून त्यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला मन्नपूरम फायनान्सचे एमडी आणि सीईओ व्ही. पी. नंदकुमार हजर होते. याप्रसंगी बोलताना श्री. प्रणव मुखर्जी म्हणाले की, माजी पंतप्रधानांनी भारताला स्थैर्य दिले आणि कठीण काळात देशाचे अर्थ पाठबळ मजबूत केले.

-Ads-

व्ही. सी. पद्मनाभन मेमोरियल ऍवार्डची स्थापना मन्नपूरम ग्रुप ऑफ कंपनीजच्या सुप्रसिद्ध संस्थापकाच्या स्मरणार्थ 2010 मध्ये करण्यात आली. पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच जीवनगौरव पुरस्कार सादर करण्यात आले. कला आणि साहित्य, नागरी सेवा, प्रशासन, व्यवसाय आणि परिसंस्था व पर्यावरण संवर्धन अशा वर्गवारीत अद्वितीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते असे कंपनीने म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्‍तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ज्यामध्ये डॉ. ई श्रीधरन (एमडी, दिल्ली मेट्रो), सेबीचे माजी अध्यक्ष श्री. एम. दामोदरन, विनोद राय (माजी कॅग) अमिताभ कांत आयएएस (सीईओ, नीति आयोग) यांचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)