आर्थिक वर्ष २०१८ मध्ये डाळींची आयात १ मिलियन टनांनी घटली

नवी दिल्ली : शासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळींची आयात करण्याचे प्रमाण जवळपास १ मिलियन टनांनी कमी झाले आहे. (२०१६-१७ मध्ये ६५ लाख टनांहून २०१७-१८ मध्ये ५५.६ लाख टन) विक्रमी उत्पादनामुळे देशाचे परकीय चलनात जाणारे सुमारे ९,७७५ कोटी रुपये वाचवण्यात मदत झाली आहे.

पुढील महिन्यात संपणाऱ्या २०१७-१८ या पीक वर्षात हे उत्पादन आतापर्यंतचे उच्चांकी म्हणजेच २३.९५ मेट्रिक टन झाले असून २०१६-१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विक्रमाला या वर्षी मागे सोडले आहे.

चांगल्या प्रमाणात झालेला मोसमी पाऊस आणि त्यापाठोपाठ शासनाने दिलेल्या चांगल्या आधारभूत किंमतीमुळे या उत्पादनात वाढ झाली आहे. भरघोस होणारे उत्पादन लक्षात घेता शासनाने डाळींवर आयात शुल्क वाढवले. शिवाय डाळींच्या विविध प्रकारावर परिणामकारक बंधने आणली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)