आर्थिक परिस्थितीची तमा न बाळगता स्पर्धेला सामोरे जा

तहसीलदार दीपक पाटील : गजानन विद्यालयात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
शेवगाव – गुणवंत विद्यार्थ्यांची सर्वच क्षेत्र वाट पाहत आहेत. त्यामुळे आपली जात, आर्थिक परिस्थिती यांची तमा न बाळगता आत्मविश्‍वासाने स्पर्धेला सामोरे जा, असे आवाहन तहसीलदार दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
तालुक्‍यातील आव्हाणे बुद्रूक येथील गजानन माध्यमिक विद्यालयात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास कळमकर, निलेश महाराज वाणी, मुख्याध्यापक रमेश लांडे, केंद्रप्रमुख विलास हुशार, वसंत भालेराव, सुधाकर चोथे, ताराचंद दिवटे, अक्षय भुसारी, ठकाजी दिंडे, प्रल्हाद पुंडेकर, दादासाहेब म्हस्के, दत्तात्रय मोकळ, संतोष थोरात, संभाजी वाघमोडे, संतराम साळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, ग्‌शालेय जीवनातील निरागस आनंद वाढत्या वयामुळे आणि जबाबदारीमुळे लोप पावतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचनक्षमता कमी होऊन एकाग्रता नष्ट होते. त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. पूर्वीच्या मानाने पुष्कळ भौतिक सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही नशीबवान आहात. आईवडील व गुरुजन यांचे संस्कार आयुष्यात कधीही विसरू नका. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टींची व अभ्यासाची स्पर्धा ठेवली पाहिजे. स्वतः ग्रामीण भागात शिक्षण घेतले आहे. दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत प्राथमिक शिक्षकापासून पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार अशा विविध पदांना गवसणी घातल्याने कठोर परिश्रम आवश्‍यकच आहेत, असे ठाम मत आहे. कॉपीमुक्‍तअभियान तालुक्‍यात राबवणार आहोत. त्यामुळे पालकांना लाचारी करण्याची वेळ आणू नका. अभ्यासाच्या माध्यमातून मिळालेले यश कायमस्वरूपी टिकते, असे पाटील यांनी सांगितले.
सभापती कोळगे म्हणाले, शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा येथील विद्यार्थ्यांना आपण स्वखर्चाने उपलब्ध करून देऊ. विद्यालयास एलसीडी प्रोजेक्‍टर प्रदान करत त्याची सुरुवात आजपासून करत आहे. यावेळी अंबादास कळमकर, अक्षय भुसारी, वाणी महाराज, शितल चोथे, अभिजित मुखेकर, आदिती पठाडे, कोमल चोथे, प्रीती कोळगे, गीता नांगरे, आकांक्षा कोळगे, प्रा. योगेश नरवडे, प्रा. एकनाथ खामकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयास ग्रीन बोर्ड भेट दिले.प्रास्ताविक सुनील शिंदे यांनी, सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले. संदीप बोरूडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)