आर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-२)

मागील काही वर्षांत लोकांमध्ये आर्थिक साक्षरता थोडी-फार वाढल्यामुळं लोक फायनॅन्शिअल प्लॅनिंग बाबतीत बोलू तरी लागलेले आहेत. खरंच हा विषय गांभीर्यानं घेण्यासारखा आहे का ? कोणत्या गोष्टी यामागे दडल्या आहेत ? काय आहेत यामागील तत्त्वं ? व आर्थिक नियोजन योग्यप्रकारे नेमकं कसं करावं ?

आर्थिक नियोजनाविषयी बोलू काही… (भाग-१)

माझी आयुष्यातील उद्दिष्ट काय आहेत उदा. २३ वर्षाच्या तरुणास/तरुणीस, चारचाकी गाडी घेणं, स्वतःचं लग्न, विदेश दौरा, स्वतःचं घर घेणं, मुलांची शिक्षणं, मुलांची लग्नं व निवृत्ती, इ. आता जर त्याचं योग्य नियोजन करण्याचं ठरवलं तर साधारणपणे २५-२६व्या वर्षी गाडी घेणं, २७-२८व्या वर्षी लग्न, २८-३० व्या वर्षी विदेश दौरा, ३०-४० दरम्यान घर खरेदी, ४५-४७व्या वर्षी मुलांच्या उच्चशिक्षणासाठी तरतूद, ५४-५५ व्या वर्षी मुलांचं लग्न व ५८-६०व्या वर्षी निवृत्ती. यातील प्रत्येक उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या पैशांची योग्यप्रकारे तरतूद करून ठेवणं म्हणजेच उद्दिष्ट नियोजन (गोल प्लॅनिंग).

-Ads-

आता ही उद्दिष्ट योग्य प्रकारे व योग्य वेळेत पार पाडण्यासाठी एक ढोबळमानानं त्यांसाठी लागणारी रक्कम ठरवणं, जसं चारचाकी घेण्यासाठी साधारणपणे डाऊन पेमेंट १ लाख पुरेसं ठरतं, लग्नासाठी सर्वसाधारणपणे ५ लाख, विदेश दौरा ३ लाख, घरासाठी डाऊन पेमेंट १०-१२ लाख रु., मुलांच्या उच्च शिक्षणासाठी २५-३० लाख रु., मुलांच्या लग्नासाठी १०-१५ लाख रु.,व निवृत्तीसाठीची रक्कम ठरवताना, मासिक खर्च व पुढील ३७ वर्षांत (६० – आताचेवय २३) त्यात होणारी वाढ गृहीत धरून तितकी रक्कम दरमहा जोखीम रहित परताव्यानुसार हातात पडेल इतकी मुद्दल गृहीत धरणं. (उदा. २३ वर्ष वयाच्या तरुणाचा आताचा असणारा ३५ हजार मासिक खर्च हा महागाई दर ८% गृहीत धरल्यास ३७ वर्षांनी म्हणजेच त्याच्या ६०व्या वर्षी ६,०३,५०० रुपयांवर जातो. म्हणजेच सुमारे १७.२५ पट वाढ. आता ६०व्या वर्षी किती रक्कम सुरक्षित ठेवीमध्ये ठेवल्यास त्याचं दरमहा व्याज हे ६,०३,५०० रु. येईल ?)

तसंच, गुंतवणूक करताना त्याची देखील वर्गवारी करणं, म्हणजे थोडक्या कालावधीसाठी लागणारी रक्कम ही कमी जोखमीच्या पर्यायात गुंतवणं, त्याचप्रमाणे मासिक उत्पन्नाच्या कमीतकमी ५-६ पट रक्कम ही सर्वात तरल (लिक्विड) अशा पर्यायात ठेवणं जी आपल्याला कधीही लगेच हातात मिळू शकते. ही रक्कम अचानक उद्भवणारे खर्च अथवा अचानक थांबलेलं नियमित दरमहा उत्त्पन्न, इ. ची काळजी घेऊ शकेल. तसेच, वरील उद्दिष्ट साध्य करायची असल्यास त्यासाठी गुंतवणूक करताना किती जोखीम घ्यायची हे देखील पडताळणं गरजेचं ठरतं. व्यक्तीचं उत्पन्न, वय, त्यावर असलेल्या इतर जबाबदाऱ्या, असलेली गुंतवणूक व संपत्ती इ. गोष्टी देखील तपासणं गरजेचं ठरतं. त्यामुळं शेअर्स, म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेव, एनपीएस,पीपीएफ सारख्या सरकारी योजना, सोनं(हेजिंग म्हणून) अथवा रिअल इस्टेट, इ. पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहेत. इन्शुरन्स या पर्यायास गुंतवणूक पर्याय म्हणून संबोधणाऱ्यांनी कोणत्याही भावनांना बळी न पडता, इन्शुरन्सच्या पारंपरिक स्कीममधून मिळणाऱ्या परताव्याचा दर हा महागाईवर खरोखर मात करतोय का हे पाहावं अन्यथा अशा योजनांमधील तुमच्या गुंतवणूकीमुळं विमा एजंटचं उत्पन्न मात्र इन्शुअर्ड होत असतं, हे लक्षात घ्यावं.

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जमवलेली बचत कोठे गुंतवायची अथवा नवीन कोणत्या प्रकारच्या ऍसेट क्लास मध्ये गुंतवणूक करायची ? नुसतं एवढेच नाही तर अशी केलेली गुंतवणूक ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जरुरी असलेला परतावा देत आहे का नाही हे वेळोवेळी तपासणं, त्यासाठी अर्थव्यवस्थेशी निगडीत मूलभूत तत्त्वं अभ्यासणं व जोखीम आणि परतावा यांचा योग्य मेळ घालणं, त्याजबरोबर त्या व्यक्तीच्या कर दायित्वाची देखील काळजी घेणं इ. अनेक गोष्टी, एका आर्थिक सल्लागाराला पार पाडाव्या लागतात. आणि म्हणूनच अलीकडं प्रत्येकास एक वैयक्तिक ‘आर्थिक सल्लागार’ असणं हे फार महत्वाचं मानलं जातंय.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)