आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला “स्टेट ऑफ स्टेट्‌स’ पुरस्कार 

नवी दिल्ली – महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी “स्टेट ऑफ स्टेट्‌स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती व्यैंकया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्विकारला.

नवी दिल्ली येथील हॉटेल ताजमहल येथे 15व्या “स्टेट ऑफ स्टेट्‌स परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यांमध्ये होत असलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विकासकामांसाठी विविध पुरस्काराने राज्यांना गौरविण्यात आले. आर्थिक क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी मिळालेला पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामुळे आणि जनतेच्या सहकार्याने राज्याची आर्थिक स्थिती उत्तम करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. तो योग्य दिशेने असून या पुरस्काराने त्यावर शिक्कार्मोतब झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील व्यापारी बांधव, उद्योग क्षेत्रातील सर्व बंधु-भगिनींना तसेच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेले परिश्रम, योग्य नियोजनाचे हे फलित आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)