आर्थिक कारभार सेवकाकडे द्या; भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात नोंद

इंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.

-Ads-

भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)