आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे! (भाग-१)

आपल्या आयुष्यात आपली काही स्वप्ने असतात. काही उद्दीष्टे असतात. त्यानुसार आपले किमान मनातल्या मनात हिशेब चालू असतात. त्याचवेळी अलिशान फ्लॅट, महागडी कार, परदेश सहल, महागडा मोबाईल अशा सगळ्या गोष्टींचे आकर्षण वाटत असते. त्याबरोबरच वयाच्या ५८ व्या वर्षाच्या आधी निवृत्त होण्याचेही स्वप्न असते. या सगळ्यांचा ताळमेळ घालायचा असेल तर आपली आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे गरजेचे असते.

निवृत्तीची घाई करू नका – चाळीशीतच निवृत्त होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. १५-२०  वर्षे नोकरी करून निवृत्तीसाठी पुरेसा पैसा गाठीशी बांधून निवृत्त होण्याचे त्यांचे नियोजन असते. पण हे सांगणे सोपे असते आणि प्रत्यक्षात आणणे अवघड असते. कारण रोज महागाई वाढत आहे आणि माणसाचे आयुष्यमानही वाढत आहे. त्यामुळे तरुण वयात निवृत्त होणे हे व्यवहार्य ठरत नाही. समजा तुम्ही निवृत्तीची तयारी वयाच्या ३५ व्या वर्षी सुरु केली आणि ४५ व्या वर्षी निवृत्त होण्याचे ठरवले असेल तर ते शक्य होऊ शकत नाही. अशा स्थितीत किमान आणखी काही वर्षे तुम्हांला निवृत्तीचे नियोजन पुढे ढकलावे लागेल. तुम्हांला ५८ च्या आधी निवृत्त व्हायचे असेल तर गुंतवणुकीला खूप लवकर सुरवात करून नियमित गुंतवणूक करत राहिले पाहिजे.

आर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे! (भाग-२)

घराबाबतच्या अपेक्षा कमी करा – प्रशस्त आणि हवेशीर घर असावे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. मग ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी घरासाठीचे बजेट शक्य तितके ताणून वाढवले जाते. परिणामी भलेमोठे कर्ज आणि दरमहा मोठ्या रकमेच्या हप्त्याचा बोजा. या सगळ्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो आणि मुलांचे शिक्षण, लवकर निवृत्ती अशा उद्दीष्टांवर विपरीत परिणाम होतो. आपण रहात असलेल्या घराव्यतिरिक्त आणखी एक घर घेणे आणि गृहकर्जाचे हप्ते भरत राहणे ही काही चांगली कल्पना नाही. जर दुसऱ्या घरातून चांगले भाडे मिळणार असेल तरच ही कल्पना लाभदायी ठरू शकते. अन्यथा दुसरे घर हे ओझे ठरू शकते. त्यामुळे घराऐवजी शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लवकर निवृत्तीसाठी फायदेशीर ठरू शकते.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)