आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी अनुदान

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील सुमारे 741 गावांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून गावनिहाय सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास अनुदान या घटकांची अंमलबजावणी प्राधिकरणाच्या हद्दीत करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये इतकी आहे. लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपातील अनुदान घर बांधण्यासाठी असून शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित रक्कमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरुपाचे घर किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल असे घर असणे आवश्‍यक आहे. यात लाभार्थ्यांना 300 चौ. फूट. क्षेत्राचे घर बांधता येणार असून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ व्हावा, यासाठी गावनिहाय अभियान राबविण्यात येत आहे. वेल्हे तालुक्‍यातील निगडे मोसे या गावात हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये 200 नागरिकांनी अर्ज भरून प्राधिकरणाकडे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)