आर्ट ऑफ लिव्हींगचे आळंदीत स्वच्छता अभियान

नगर – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर आळंदी मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. त्यातून दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्‍यता जास्त असते. म्हणून आर्ट ऑफ लिव्हींगच्या नगर शाखेने आळंदीची स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. इंद्रायणी घाट परिसर , मंदिर परिसर तसेच इतर परिसराची स्वच्छता साधकांनी केली .त्यांच्या याउपक्रमाची स्थानिक जिल्हा प्रशासनाने दखल घेवून या कामाचे खूप कौतुक केले. अशी माहिती अमर कळमकर यांनी दिली .

यावेळी अहमदनगर मधुन स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रा तुन समारे 400 स्वयंसेवक होते .काल केलेले स्वच्छता अभियान यशस्वी पार पाडुन या तरुणांना आता पंढरपूर स्वच्छतेची ओढ लागली आहे .पंढरपुर येथील अभियान दि.6रोजी हजारो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन अमर कळमकर यांनी केले . रविवारच्या अभियानात जयंत भोळे ,अमर कळमकर ,तुकाराम जावळे ,अविनाश काकडे ,योगेश काकडे ,तुषार केदार ,आकाश रासकर इ .यांसह इतर कार्यकर्ते हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)