आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वुलन रग्ज वाटप

चिंबळी- आर्ट ऑफ लिव्हिंग मोशी, चिंबळी आणि चाकण केंद्रातील साधकांच्या वतीने मुळशी तालुक्‍यातील आंबडवेट आणि गडदावणे येथील दुर्गम भागातील वस्तीतील कातकरी, ठाकर समाजातील गरजूंना नवीन उबदार रग्ज आणि दिवाळी फराळाचे वाटप रविवारी (दि. 11) करण्यात आले. हा उपक्रम गेली 11 वर्षे चालू आहे. या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुलाब बनकर, रुपेश सस्ते, सुरेखा बनकर, सतीश फापळे, डॉ. बाबासाहेब मगर, विजया आल्हाट, श्रीकांत बनकर, भागवत गोरे, माधुरी बहिरट, प्रिया बारणे, प्रसाद देवकर आदी 35 साधकांचे योगदान लाभले. या दुर्गम भागात प्रथमच सकाळी भल्या पहाटे दिवाळी फराळ आणि नवे कोरे उबदार रग्ज मिळाल्याने येथील नागरिकांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाला अनाथसाठी कार्य करणारी आंबडवेट येथील राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेचे सखाहरी वायबसे आणि राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)