आरोप – प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले

आ. शंभूराज देसाई-सत्यजितसिंह पाटणकर यांची विधानसभेपूर्वीच कार्यक्रमातून होतेय टीका

कराड – विधानसभा निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी असताना आमदार शंभूराज देसाई व युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील आरोप -प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे ऐन थंडीत पाटणचे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधानसभा निवडणुकी पूर्वीच आ. शंभूराज देसाई व युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल नेत्यांना झाली आहे. शिवसेना पक्षपमुख उध्दव ठाकरे यांनी आयोध्येत जाऊन राममंदीर उभारण्याची मागणी केली याच कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार असणारे शंभूराज देसाई का गेले नाहीत असे विचारत त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

तुम्ही सहकार परिषदेचे अध्यक्ष असताना कसा भोंगा वाजविला हे जाहीर असल्याचे सांगून मोदी लाटेवर निवडून आलेल्यांनी तब्बल सहावेळा निवडून आलेल्या माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची मापे काढू नयेत अगोदर स्वत:चे कर्तुत्व सांगावे कारखाना ताब्यात असताना कोणताही पूरक प्रकल्प तुम्हाला उभारता आला नाही, अशी टीका करून शंभुसेनेतून बाहेर पडून लोक आमच्याकडे येत आहेत, अशी खरमरीत टीका मोरगिरीतील कार्यक्रमात केली होती.

त्यावर आमदार शंभूराज देसाई यांनी राजकीय कोटी करून राष्ट्रवादीचे खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला. पक्षनिष्ठेविषयी चिंता करणाऱ्या युवा नेत्यांनी उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमाला का गेला नाही, असा प्रतिसवाल केला. आमच्या नेत्यांनी आयोध्येला न येता नदीकाठावर महाआरती करण्याच्या सूचना दिल्याचा खुलासा आ. देसाई यांनी दिला.

या दोघांमधील राजकीय हल्ला प्रतिहल्ल्याचा जोर पुन्हा वाढला आहे. युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुन्हा सातारा-मरळी शटल सेवेचा मुद्दा उपस्थित करून आमदार देसाईंना लक्ष केले तर आ. देसाई यांनी तुमच्याकडे सत्ता नाही. जनतेला देण्यासारखे काही नसल्याने कोणत्या तोंडाने जनतेपुढे जाणार असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याबरोबरच नवीन साखर कारखाना काढण्यासाठी घेतलेले पैसे परत करा असाही सल्ला दिला.

आमदार शंभूराज देसाई यांच्यावर पलटवार करताना सत्यजितसिंह पाटणकर यांनी ढेबेवाडीत जाऊन कोयनेचे तर तारळ्यात जाऊन कुंभारगावचे दाखले द्यायचे. त्यामुळे पाटणचा विकास सांगायला त्यांना कराडला का जावे लागते, असा सवाल उपस्थित केला. तुमच्या माध्यमातून झालेला विकास खरा असेल तर पाटणमध्येच तो का सांगितला जात नाही, असे म्हणत भुलथापा मारण्यात तुम्ही पटाईत असल्याची टीका केली. तर यावर्षी पाटण तालुक्‍यात पावसामुळे पिके कुजून गेली मुख्यमंत्री तुमचे मित्र असताना विधानसभेत याविषयावर आवाज का उठावला नाही.

पुरवणी यादीत चार विभागांचा समावेश करून स्वत:ची पाट थोपटून घेणे हेच कर्तुत्व असल्याची टीका सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली. त्यामुळे पाटण ालुक्‍यात नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेने तालुक्‍यातील वातावरण तापले आहे. आ. शंभूराज देसाई व युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्यकर्ते ही चार्ज होताना दिसत आहेत.

दोन मोठ्या समारंभाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी समारंभाची तयारी राष्ट्रवादीकडून जोरदार सुरू आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्‍तिप्रदर्शन करण्याची संधी निर्माण झाली आहे. तर 35 ते 40 वर्ष तालुक्‍याची सेवा केलेले माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. मात्र या कार्यक्रमात आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत पुन्हा युवा नेते आ. शंभूराज देसाई यांच्यावर कोणती तोफ डागणार याकडे जाणकारांचे लक्ष असणार आहे. तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी लवकरच मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याही कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)