आरोप करण्यापेक्षा एकदा समोरासमोर या – उद्धव ठाकरे

ठाणे – आमच्यावर बेछूट आरोप करण्यापेक्षा एकदा समोरासमोर या, माझी तयारी आहे, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे योगी आदित्यनाथ यांना लगाविला.

मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच होणार, हे माहित असतानाच गावित यांच्याशी बोलून ठेवले. मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही? मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या मनात होते, मग तुम्ही मोदीसारखे रेडिओवर का नाही बोलत?, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. 15 लाख रुपये बॅंकेत जमा होणार, अच्छे दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाहीत. उत्तर प्रदेशमधून माणसे आणतात. एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता. मात्र निष्ठेचा पराभव तुमचे भाडोत्री माणसे करु शकत नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेवर टीका केली.

योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अखिलेश यादव परवा म्हणाले, जो मुख्यमंत्री भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही ते लोकांना काय मदत करणार? आज ते पलीकडे आलेत, त्यांच्या राज्यात मुलांना ऑक्‍सिजन मिळत नाही ते इथे आलेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)